💥युरोप आणि अमेरिकेतही अशाच प्रकारच्या प्रयोगांनी चांगले परिणाम समोर आले आहेत💥
नवी दिल्ली (दि.01 जुन 2021) - कोविड -19 टास्क फोर्स अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा म्हणाले की, येत्या काही आठवड्यांत भारत दोन वेगवेगळ्या कंपनीच्या कोविड-19 प्रतिबंधात्मक डोसेस नागरिकांना देता येऊ शकते काय ? यावर अभ्यास करून योग्य तो निर्णय घेऊ शकतो. दोन वेगवेगळ्या लसींच्या डोसेस देण्यामध्ये व्यवहार्यतेची चाचणी घेण्यास सुरुवात करण्यात येणार आहे युरोप आणि अमेरिकेतही अशाच प्रकारच्या प्रयोगांनी चांगले परिणाम समोर आले आहेत.
वेगवेगळ्या कोविड लसींचे दोन डोस मिसळल्यास सार्स- सीओव्ही -2 (कोरोना व्हायरस) पासून रोखण्यास योग्य ती प्रतिकारशक्ती मिळू शकते की नाही याची तपासणी करण्यासाठी भारत चाचणी सुरू करण्याच्या तयारीत आहे डॉ.अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली लसीकरण राष्ट्रीय पातळीवर गट कार्यरत आहे. काही लोकांना त्यांच्या दुसर्या डोससाठी एका दुसर्या कंपनीची लस दिल्याच्या घटनानंतर दोन वेगवेगळ्या कोविड -19 लसी दिल्यास काय परिणाम होतील ? यावरील चर्चेला भारतात उधाण आले होते. उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात ही घटना घडली होती. जिथे जवळजवळ 20 लोकांना कोवॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला. त्यांना पहिला डोस म्हणून कोविशिल्डचा देण्यात आलेला होता कोविड -19 च्या लसींचे मिक्स डोस देण्याच्या शक्यतेवर तज्ज्ञ आता विचार करत आहेत. लवकरच कोविड लसींच्या दोन वेगवेगळ्या डोसेस देण्याची चाचणी लवकरच सुरू होईल.
दररोज 1 कोटी लोकांना लसीकरण करण्याचे ध्येय
डॉ. एन. के. अरोरा म्हणाले की, पुणेस्थित सिरम इन्स्टिट्ययूट ऑफ इंडिया (एसआयआय) आपल्या उत्पादन क्षमतेत 50 टक्क्यांनी वाढ करीत आहे. एसआयआयने लिहिलेल्या पत्राचा हवाला देताना डॉ. अरोरा म्हणाले की, सिरम कंपनीने जूनपासून प्रति महिना 10-12 कोटी डोस तयार करण्यास सुरूवात केली तर हैद्राबादस्थित भारत बायोटेकने सांगितले की, जुलै 2021 च्या अखेरीस त्यांची उत्पादन क्षमता वाढवेल. यामुळे दरमहा कोवॅक्सिनच्या 10-12 कोटी डोसचे उत्पादन होऊ शकते, असे ते म्हणाले.
ऑगस्टपर्यंत आमच्याकडे दरमहा 20 ते 25 कोटी लस डोस असतील. इतर उत्पादकांकडून किंवा काही आंतरराष्ट्रीय लसींचे डोस मिळाल्यास आणखी यामध्ये वाढ होईल . जेणेकरून दररोज 1 कोटी लोकांना लसी देण्याचे उद्दीष्ट आहे, असे डॉ. एन. के. अरोरा म्हणाले. .
0 टिप्पण्या