💥मुंबईतील दादर परिसरात सायबर भामटय़ांकडून डॉक्टरची लाखोंची फसवणूक....!


 💥याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांकडे तक्रार दाखल💥 

मुंबई : सीमकार्ड बंद पडणार असल्याची बतावणी करून एका डॉक्टरची सायबर भामटय़ांनी १० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना दादर परिसरात घडली. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे ६४ वर्षीय डॉक्टर बी.एस.एन.एल.चे सीमकार्ड वापरतात त्यांच्या भ्रमणध्वनीवर शुक्रवारी दुपारी सीम कार्डसाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता न केल्याने कार्ड बंद केले जाणार आहे असा संदेश आला त्यामध्ये एक संपर्क क्रमांक दिला होता. 

डॉक्टरांनी संदेशात दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला यावेळी समोरून बोलणाऱ्याने भ्रमणध्वनीवर एका फॉर्मची लिंक पाठविली भामटय़ाने सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांनी फॉर्ममध्ये त्यांच्या बँक खात्याची सर्व माहिती भरून दिली ही माहिती प्राप्त होताच भामटय़ाने अध्र्या तासात त्यांच्या खात्यातून परस्पर १० लाख २२ हजार रुपये वळते केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या