💥वाशिम जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना : दोन भावांच्या मृत्यूची माहिती मिळताच मित्राचाही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू...!


💥वाशीमच्या मानोरा तालुक्यातील शेवटच गाव असलेल्या सोयजना या गावावर पसरली शोककळा💥

✍️फुलचंद भगत

वाशिम :- दोन भावांच्या मृत्युची माहीती मिळताच मिञाचाही ह्रदयविकाराच्या तिव्र धक्क्याने मृत्यु झाल्याची वाशिम जिल्ह्यात अत्यंत दुःखद घटना घडली आहे.वाशिममध्ये दोन सख्ख्या भावांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. मोठ्या भावाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर धाकट्या भावाचा मृत्यू झाला. तर दोन भावांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मित्राचा मृत्यू झाला आहे.

              वाशीमच्या मानोरा तालुक्यातील शेवटच गाव असलेल्या सोयजना या गावावर  शोककळा पसरली. गावातील पवार कुटुंबातील दोन सख्या भावांचा  तासाभराच्या अंतराने मृत्यू झाला. गावातील ही दुख:द बातमी धनंजय कोल्हे यांना  कळली आणि त्यांना देखील हृदयविकाराचा  झटका आला आणि त्यांचाही उपचारदरम्यान  मृत्यू झाला.सोयजना  गावतील  जनार्धन  पवार यांना किडनीचा आजार होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरु होते. काल रात्री त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला होता, मात्र गावी निघालेल्या जनार्धन पवार (वय 75)  यांचा वाटेत  यवतमाळजवळ मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबात एकूण 2 मुली, 2 मुले, पत्नी आहेत. त्याचवेळी पार्थिव गावी आल्यानंतर त्यांचे धाकटे बंधू मुरली पवार (73 वर्ष) यांना ही बातमी कळली आणि त्यांनाही हृदयविकारचा धक्का बसला. त्यांना दिग्रस येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.दोन्ही  भाऊ विभक्त असून सुद्धा त्यांच्यातील प्रेम टिकून होतं. गावातील दोन भावांच्या मृत्यूची बातमी कळताच गावतील  त्यांचे मित्र धनंजय कोल्हे (53 वर्ष) यांनाही हृदयविकाराचा झटका आला. त्यांनाही उपचारासाठी दिग्रस येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. गावात एकाच दिवशी तीन जनांच्या मृत्यूने  झाल्याने शोककळा पसरली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या