💥भारतात 93,828 नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद....!

 


💥कोरोनाबाधीत रुग्णांचा राष्ट्रीय मृत्यू दर सध्या 1.02 टक्के आहे💥

नवी दिल्ली :  देशभरात सद्यस्थितीत एकूण 2,76,45,225 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून  गेल्या 24 तासात 1,48,951 रुग्ण कोरोनातून बरे झाले.   गेल्या 24 तासांत देशभरात 93,828 नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली.  नव्या रुग्णांपैकी अधिकांश रुग्ण हे कर्नाटक, महाराष्ट्र , केरळ, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, दिल्ली,  गुजरात आणि राजस्थान या 10 राज्यांमध्ये आहेत. भारतात आज उपचाराधीन  रुग्णांची एकूण  संख्या 11,65,487 आहे.   देशात 37.01 कोटीं हून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत आणि एकूण पॉझिटीव्हीटी दर  4.51 % आहे.राष्ट्रीय मृत्यू दर सध्या 1.02 टक्के आहे.

💥महाराष्ट्रात  10989  कोरोना बाधित रुग्णांची वाढ ;-

राज्यात आज 10,989 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 16,379 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 55,97,304 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,61,864 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.45% झाले आहे.

तामिळनाडूमध्ये  मध्ये सर्वात जास्त म्हणजे 17321  नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर महाराष्ट्र- 10989, कर्नाटक- 10959, केरळ - 16204, तामिळनाडू - 17321, आंध्र प्रदेश - 8766, पश्चिम बंगाल-5384, ओदिशा - 6019 , तेलंगणा – 1813 आणि दिल्लीमध्ये 337 नव्या रुग्णांची नोंद झाली.

भारतात आज उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 11,65,487 आहे.  देशात गेल्या 24 तासात 6138 रुग्णांचा मृत्यू झाला. तामिळनाडूमध्ये  सर्वाधिक 405 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात 261, केरळ -156, आंध्र प्रदेश-67,  कर्नाटक- 192,  दिल्ली 36 जणांचा मृत्यू झाला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या