💥परभणी शहरातील मान्सुनपुर्व नाले सफाई तात्काळ सुरु करावी....!

💥जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या निवेदनाची दखल घेऊन पालिका प्रशासनास दिले लेखी आदेश💥

परभणी (दि.२५ मे २०२१) - शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील डॉक्टर लाईन बसस्टॅन्ड रोडवरील मुख्य नाला, दिग्गी बालाजी रोड वरील नाला, ललितकला भवन रोड वरील नाला व नांदखेडा रोड वरील नाला हे प्रमुख मोठे नाले दरवर्षी मान्सून सुरु होण्याच्या साधारण एक महिना अगोदर मान्सूनपूर्व तयारी म्हणुन साफ केले जातात तसेच शहरातील इतर मध्यम स्वरुपाचे व पाणी तुंबण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या नाल्यांचीही सफाई केली जाते परंतु या वर्षी मात्र नाले सफाई वेळेवर झालेले नाही. शहरातील सर्व मुख्य नाले हे कचऱ्याने तुडुंब भरले असुन याची साफसफाई पावसाळा सुरु होण्या अगोदर करणे अत्यंत गरजेचे आहे आणि ती त्वरित करावी या मागणी साठी आज प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने व प्रहरच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्ट मंडळाने दि.१९ मे २०२१ रोजी श्री. दिपक मुगळीकर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले होते तसेच निवेदनात शहरातील कचऱ्याने भरलेल्या सर्व प्रमुख मोठ्या नाल्याचे फोटो पुरावा म्हणून सादर केले होते त्यावर तत्काळ निर्णय घेत जिल्हाधिकारी यांनी पालिका प्रशासनास तत्काळ नाले सफाई करावी असे फोनवर तोंडी आदेश दिले होते.


दरवर्षी नाल्यांची साफसफाई करुनही शहरातील डॉक्टर लाईन, नारायण चाळ, बसस्टॅन्ड, गांधीपार्क व गुजरी बाजार या व्यापारी प्रतिष्ठाने असलेल्या भागामध्ये अनेकदा पाणी तुंबल्याच्या घटना घडलेल्या आहेत या सर्व पार्श्वभूमीचा विचार करुन महानगरपालिकेने दक्षता घेणे आवश्यक आहे. मान्सुन सुरु होण्यासाठी आवघे १०-१२ दिवस शिल्लक असतानाही परभणी शहर महानगरपालिका प्रशासन मात्र या गंभीर विषयाकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे.


जिल्हाधिकारी परभणी यांच्या तोंडी आदेशाच्या ७ दिवसानंतर ही पालिका प्रशासनाने काहीच कार्यवाही केली नाही या बाबत आज दि.२५ मे २०२१ रोजी जिल्हाधिकारी यांच्या कडे परत तक्रार केली त्यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्हा प्रशासन अधिकारी, नगर पालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय यांनी आयुक्त महानगर पालिका परभणी यांना तातडीचे आदेश काढत शहरातील मान्सून पूर्व नाले सफाई तत्काळ करावी असे लेखी आदेश काढले आहेत.आजच्या जिल्हाधिकारी यांना भेटणाऱ्या शिष्ट मंडळात प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे शहर प्रमुख पिंटु कदम, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर अदी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या