💥परभणी जिल्ह्यात आज सोमवार दि.३१ मे रोजी आढळले ५४ कोरोनाबाधीत रुग्ण...!


💥जिल्ह्यात आज सोमवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान ३ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू 💥

परभणी (दि.३१ मे २०२१) - परभणी जिल्हात आज सोमवार दि.३१ मे २०२१ रोजी केवळ ५४ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनासह पोलिस प्रशासन कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढू नयें याकरिता सातत्याने प्रयत्न करीत आहेत जिल्ह्यातील कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी व्हावा याकरिता नागरिकांनी प्रशासकीय निर्देशांचे एक जवाबदार नागरिक म्हणून अत्यंत जवाबदारीने पालन करीत प्रशासनाला सहकार्य केल्यास कोरोना महामारीला निश्चितच लगाम लागेल यात शंका नाही आज सोमवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान ३ कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सातत्याने कमी होत असून याचे सर्वस्वी श्रेय आरोग्य प्रशासनातील आरोग्य तज्ञ व आरोग्य कर्मचाऱ्यांसह जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलिस दलाला जाते कारण जिल्ह्यातील आरोग्य विभागातील आरोग्य तज्ञ व कर्मचारी कोरोनाबाधीत रुग्णांचा अत्यंत यशस्वीपणे उपचार करतांना दिसत असल्याने व जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलिस दल लॉकडाऊन संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असल्याने दिवसेंदिवस कोरोनामुक्तांची संख्या ही वाढतांना दिसत आहे.

जिल्ह्यात आज सोमवार दि.३१ मे २०२१ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचार घेऊन पुर्णपणे बरे झालेल्या १४१ रुग्णांना रुग्णालय प्रशासनाने सुट्टी दिली असून जिल्ह्यात आजपर्यंत ४९९२३ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून यशस्वी उपचारा नंतर आजपर्यंत ४५५५८ कोरोनाबाधीत कोरोनामुक्त झाले आहेत तर जिल्ह्यात आजपर्यंत १२३१ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने एका प्रेसनोट द्वारे कळवले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या