💥पुर्णेत बाल कलावंतांनी महात्मा बसवेश्वरांना सुंदर रांगोळीतून केले अभिवादन...!


💥भव्य आणि सुंदर अशी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेची रांगोळी गुरुबुद्धिस्वामी मठात साकारली आहे💥

पूर्णा (दि.१४ मे २०२१) पुर्णेतील अष्टपैलू कलावंत रवी बिचडे यांची कन्या आर्या रवी बिचडे व तिची सहकारी मैत्रीण गौरी एकलारे यांनी सलग दोन दिवस परिश्रम घेऊन येथील गुरुबुद्धिस्वामी मठ या देवस्थानात जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची भव्य आणि सुंदर अशी रांगोळी साकारली आहे.

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनी या कलावंतांनी साकारलेली ही रांगोळी पाहण्यासाठी पूर्णेकर नागरिकांनी शिस्तीत येऊन ह्यांच्या कलेला मोठी दाद दिली आहे सुमारे ४x६ फूट अशी ही रांगोळी साकारण्यासाठी महागडे रंग वापरण्यात आले असून सदर कलावंतांचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे...

साभार - केदार पाथरकर, पूर्णा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या