💥हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी परिसर गूढ आवाजाने पुन्हा हादरला....!


💥जमिनीतुण गूढ आवाज येऊन धक्के जाणवत असल्यामुळे नागरिकांमधे भिंतीचे वातावरणात निर्माण झालें आहें💥

✍️हिंगोली प्रतिनिधी - शिवशंकर निरगुडे -

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी व परिसरातील भागात आज सकाळी सात ते आठ गावामध्ये सकाळी दहा वाजता च्या सुमारास जमीणीतुण गूढ आवाज होऊन सौम्य हादरा जाणवला अचानक घरच्या भिंती हादरल्यामुळे नागरिक भितीने घरा बाहेर पडले या परिसरात मागील तीन ते चार वर्षा पासून जमीणीतुण गूढ आवाज येऊन धक्के जाणवत असल्यामुळे नागरिकांमधे भिंतीचे वातावरणात निर्माण झालें आहें.

 औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी .जामगव्हान राजदारी  .नंदापुर या सह या भागातील गावामध्ये सकाळी 6.30 मिनिटांनी अचानकपणे जमीणीतुन गूढ आवाज आला या नंतर गावातील घराच्या भिंती हादरल्या यामुळे ग्रामस्थांमधे भितीने वातावरणात पसरले व नागरिकांनी घरातून पळ काढला या गूढ आवाजाचे केंद्रस्थान वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे आहें या परिसरात देखिल हादरे जाणवले या भागात मागील तीन ते चार वर्षा पासून सतत हादरे जाणवत आहेत प्रशासनाच्या वतीने याबाबत कुठल्याही उपाय योजना केल्या नाहीत भूवैज्ञानिक मार्फत या भागातील विविध भागामध्ये गूढ आवाजाचे गुपित मात्र उलगडले नाही यामुळे या परिसरातील नागरिकांना कधी काय होईल या भितीने अनेक ग्रामस्थ रात्र जागून काढल्या जात आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या