💥परभणी जिल्ह्यात आज रविवारी दिलासादायक परिस्थिती ; जिल्ह्यात आज औषधोपचारानंतर ६८४ व्यक्ती कोरोनामुक्त...!


💥जिल्ह्यात आज रविवारी नव्याने आढळले ४८९ कोरोनाबाधीत रुग्ण 💥

परभणी (दि.१८ एप्रिल) - जिल्ह्यात आज रविवार दि.१८ एप्रिल २०२१ रोजी काही प्रमाणात का होईना परंतु दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली असून आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी औषधोपचारानंत तब्बल ६८४ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आज रविवारी जिल्ह्यात नव्याने ४८९ कोरोनाबाधित रुग्ण आढलले आहेत तर जिल्ह्यात आज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ८ कोरोनाबाधित व्यक्तींचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

शासकीय जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात ५ हजार ७३४ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ६३१ कोरोनाबाधित व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत २५ हजार ५१४ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी १९ हजार १४९ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत २ लाख ११ हजार ३३७ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख ८५ हजार ०८३ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर २५ हजार ३६६ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह,७४८ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या