करोनासाठी लसीकरण सुरू झाल्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला होता मात्र आता लसीचा तुटवडा हा नवा चर्चेचा आणि राजकारणाचा विषय ठरला आहे त्यात आता करोना लसीच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा देखील तुटवडा जाणवू लागल्याचं समोर आलं आहे इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार कोविशिल्ड या करोना लसीचं उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटचे अदर पुनावाला यांनी ही माहिती दिली आहे.
“अमेरिका आणि युरोपमधून करोना लसीसाठी लागणारा कच्चा माल येतो मात्र त्यांनी त्याचा पुरवठा थांबवल्यामुळे सिरम इन्स्टिट्युटला कच्चा माल मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे” असं अदर पुनावाला यांनी म्हटलं आहे त्यामुळे देशातील करोना लस निर्मितीचा वेग मंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे.
वेगवेगळ्या राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू करण्यात आलं आहे त्यामुळे देशभरातून करोना लसींची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे महाराष्ट्रासह काही राज्यांनी आत्तापासूनच करोना लसींचा आवश्यक तेवढा पुरवठा केंद्राकडून मिळत नसल्याची तक्रार केली आहे त्यामुळे आगामी काळात करोना लसींची मागणी अजून वाढणार असताना लसींच्या निर्मितीसाठी कच्च्या मालाची कमतरता भासणं ही चिंतेची बाब मानली जात आहे.
“शक्य असतं, तर मीच अमेरिकेत आंदोलन केलं असतं” दरम्यान, अदर पुनावाला यांनी अमेरिका आणि युरोपकडून लवकरात लवकर कच्च्या मालाचा पुरवठा सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे....
0 टिप्पण्या