💥मंगरुळपीरचे तहसिलदार नरसैया कोंडागुरले यांची शेतकर्‍याप्रती कर्तव्यतत्परता...!


💥कोठारी येथील शेतकर्‍याला तात्काळ विजजोडणीचे महावितरणला आदेश💥 

💥२०१४ पासुन कोटेशन भरुनही मिळाले नव्हते विज कनेक्शन,दोषीवर कारवाईचे आदेश💥

मंगरुळपीर:- तालुक्यातील कोठारी येथील शेतकर्‍याला तात्काल कृषी पंपासाठी विजजोडणी करा आणी कागदोपञी विज कनेक्शन दाखवलेल्या जबाबदार दोषी अधिकार्‍यावर कारवाई करा असे आदेश तहसिलदार नरसैया कोंडागुरले यांनी दिले असल्याने शेतकर्‍याप्रती तहसिलदार यांची कर्तव्यतत्परता दिसुन येत असल्याने शेतकरी वर्गातुन तहसिलदार यांच्या आदेशाचे कौतुक होत आहे.कृषीपंपाला विजजोडणीच्या आशा या आदेशामुळे पल्लवीत झाल्या आहेत सन २०१४ मध्ये गट नं. ७९ मध्ये मौजे धानोरा शेत शिवारात कोटेशन भरुनही अदयापपर्यंत कृषि कनेक्शन न मिळता महावितरणने कागदोपत्रीच खंबे उभे करुन कनेक्शनही जोडलेले दाखविले व बिलही आले आहे या विषयी सखोल चौकशी करुन दोषी ठेकेदार व महावितरण अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करुन तात्काळ गुन्हे दाखल करा आणी कृषी पंपासाठी विज जोडणी करुन द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण

उपोषणाला सहकुटुंब सुरुवात करीत असल्याचे लेखी निवेदनाव्दारे मंगरुळपीर तालुक्यातील कोठारीच्या संदिप सुदाम इंगोले या शेतकर्‍याने इशारा दिला होता.इंगोले हे  अल्पभूधारक शेतकरी असुन दिनांक ०६/०१/२०१४ (ग्राहक क्रमाक १७०००००२११२ ) शेतामध्ये विज कनेक्शनसाठी सन २०१४ मध्येच कोटेशन भरलेले आहे. त्यानंतर सदर शेतकर्‍याने खुप दिवस कनेक्शन न लावल्यामुळे वेळोवेळी लेखी निवेदनाव्दारे विभागाला कळविले होते.परंतु लवकरच कनेक्शन जोडण्यात येईल असे उडवा उडवीची उत्तरे देवुन मंगरुळपीर येथील महावितरण कंपनीने वारंवार परत पाठविले.इंगोले हे अल्पभूधारक शेतकरी असल्याने शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे कठीण झाल्याने सिंचनाच्या सोईसाठी त्यांनी विज कनेक्शनसाठी अर्ज केला होता परंतु एवढे दिवस उलटुनही कनेक्शन न मिळाल्याने वारंवार लेखी तोंडी निवेदनाव्दारे मागणी करीत होते. असे असतांनाच मंगरुळपीर महावितरणाचे अधिकारी उलट शेतकर्‍यावरच भडकले आणि तुमचे कनेक्शन तर ५ डिसेंबर २०१७ रोजीच लावलेले असुन तुम्हाला १३ हजार रुपये बिलही आले. तात्काळ तुम्ही बील भरा नाहीतर तुमच्यावर कारवाई करु असा उलट दम दिला. हे एकल्यावर शेतकर्‍याला आश्चर्याचा धक्काच बसला कारण खंबेही न गाडता मिटरही न लावता  बिल कसे आले ? महावितरणच्या रेकॉर्डला खंबे लावुन मिटर व  विज कनेक्शन लावल्याची खोटी माहिती कुणी दिली. ? हा प्रश्न पडला आहे. दिनांक १९/०३/२०२० रोजी महावितरणाच्याच कर्मचा-याने स्पॉट पंचनामा करुन शेतात खंबे नसुन मिटरही नाही असा लेखी अहवालही विभागाला सादर केला असे असतांना कागदोपत्रीच शेतात विजनकनेक्शन दाखवुन

लाखोचे बिल काढुन सबंधीतांनी हडप केले व  वेळोवेळी मानसिक व आर्थीक त्रास सहन करावा लागत आहे असा आरोप निवेदनकर्ते संदिप इंगोले यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन १५ दिवसाचे आत तात्काळ सबंधीत महावितरण अधिकारी कर्मचारी आणी ठेकेदारावर गुन्हे दाखल करुन मागणी केल्यानुसार तात्काळ विज कनेक्शन जोडुन दयावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे सहपरिवारासह आमरण उपोषणास सुरवात करणार आहो.या दरम्यान कुटुंबीयाच्या जिवीत्वाची जबाबदारी महावितरण आणि जिल्हाधिका-यांची असेल असा इशारा शेतकरी संदिप इंगोले यांनी लेखी निवेदनाव्दारे मुख्यमंञी यांना आणी सर्व सबंधित विभागांना दिला होता.शेतकर्‍यांच्या या महत्वपुर्ण निवेदनाची येथील तहसिलदार यांनी दखल देवुन याप्रकरणी सखोल चौकशी करुन दोषीविरुद्ध कार्यवाही करावी तसेच अर्जदार यांनी मागणी केल्यानुसार तात्काळ विजकनेक्शन जोडुन द्यावे असा आदेश मंगरुळपीर येथील महावितरणचे ऊपअभियंता यांना दिले आहे.या आदेशामुळे शेतकर्‍यांना कृषीपंपाला विजजोडणीच्या आशा पल्लवित झाल्या असुन शेतकरी प्रश्नावर तहसिलदार यांनी कर्तव्यदक्षता दाखवल्यामुळे त्यांचे शेतकर्‍यांमधुन कौतुक होत आहे.


प्रतिनीधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या