💥पोलिस अधिकाऱ्यांनी विविध कंपनीचा जप्तीतील अवैध गुटखा एकत्र करून जाळून केला नष्ट💥
पूर्णा (दि.०७ एप्रिल) - पूर्णा नदीकाठावर मोकळ्या जागेत २४ लक्ष ८३ हजार ९७ रुपयांचा गुटखा जाळुन केला नष्ट ...पूर्णा पोलिस प्रशासनाने दिलेल्या अधिक माहीतीवरुन मागील २४ महीन्याच्या कालावधीत विविध ठिकाणी छापे मारुन २४ लाख ८३ हजार ९७ रुपयांचा गुटखा पकडलेला पूर्णा पोलिस ठान्यात पडुन होता न्यायालयाने गुटखा नष्ट करण्यात यावा असे आदेश पूर्णा पोलिसांना दिले . पूर्णा पोलिसांनी जिल्हास्तरावरील वरिष्ठ आधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा नदी पात्राजवळ मोकळ्या जागेत गुटखा एकत्र करुन जाळून नष्ट मंगळवार (ता .०६ ) करण्यात आला .दोन पंचासह पोलीस निरीक्षक भागोजी चोरमले,पी एस आय माणिक गुट्टे , परभणीचे अन्न व भेसळ विभागाचे प्रविण कच्छवे ,संतोष भगुरकर यांच्यासह इतर कर्मचारी सोबत होते...
0 टिप्पण्या