💥मुंबई महापालिकेचा नवा नियम पाळणे बंधनकारक; गृह विलगीकरण आता १७ दिवस...!


💥महापालिकेने नुकतीच गृह विलगीकरणासंदर्भात सुधारित सविस्तर मार्गदर्शक सूचना जाहीर केली💥

 मुंबई : लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेल्या करोना बाधित रुग्णांसाठी गृह विलगीकरणाचा एकूण कालवधी सतरा दिवसांचा असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे हा कालावधी पाळणे आवश्यक असून त्यात कोणतीही कपात करण्यात आली नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे गृह विलगीकरणासंदर्भात पालिकेने नुकतीच  सुधारित सविस्तर मार्गदर्शक सूचना जाहीर केली होती सुधारित सूचनांनुसार आता एकूण सतरा दिवस विलगीकरण पाळणे आवश्यक आहे. 

लक्षणे नसलेले बाधित (असिम्पमॅटिक) किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरीच विलग राहून आणि सोबत योग्य औषधोपचार घेवून लवकर बरे होवू शकतात असे रुग्ण बाधित झाल्याचे स्पष्ट झाल्यापासून दहा दिवस गृह विलगीकरणात राहिल्यानंतर त्यांना महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी पथकाच्या सल्ल्यानेच डिस्चार्ज मिळाल्याचे मानण्यात येईल त्यासाठी संबंधित रुग्णाने त्यांच्या विभागाच्या वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) पथकाकडे दहा दिवस पूर्ण झाल्यावर प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती देणे आवश्यक राहील. 

त्यानंतर इतर सर्व रुग्णांप्रमाणेच पुढील सात दिवस गृह विलगीकरण पाळणे आवश्यकच आहे म्हणजेच दहा अधिक सात असे एकूण सतरा दिवस गृह विलगीकरण कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे त्यात कोणतीही सूट दिलेली नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे तसेच विलगीकरण कालावधी योग्यरीत्या पाळून सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्याच्या  कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.  मंगला गोमारे यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या