💥चंद्रपुर जिल्ह्यातील सिंदेवाहीतील अधिकाऱ्याने केला महिला वैद्यकीय अधिकारीचा विनयभंग....!


💥महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या लेखी तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल💥

चंद्रपुर ; जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या लेखी तक्रारीवरून गटविकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.


सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे यांनी दिलेल्या माहीतीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील महिला वैद्यकीय अधिकारी यांना प्रभारी गटविकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांनी स्वतःच्या कार्यालयात बोलावून त्यांचा विनयभंग केला. तसेच त्यांना मानसिक त्रास दिला. याबाबत त्या महिला अधिकारीने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे गटविकास अधिकाऱ्या विरोधात भादवि कलम ३५४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पीएसआय नेरकर करीत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या