💥राज्याचे परिवहण मंत्री अनिल परब यांचीही सिबीआय.चौकशी करा - भाजपा


💥काहीजण सुपात आहेत तर काही जण जात्यात असं म्हणत आघाडीतील मंत्र्यांवर पाटील यांनी निशाणा साधला💥 

मुंबई ; मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे पुर्व गृहमंत्री अनिल देशमुख यांना पायउतार व्हावे लागले देशमुख यांच्या विरोधात सिबीआने नुकताच गुन्हा दाखल केला आहे परमबीरसिंह यांनी केलेल्या आरोपां प्रकरणी देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून नागपूरमधील त्यांच्या घरावर सिबीआयने छापा घातला आहेत याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता शिवसेना नेते तथा राज्याचे परिवहण मंत्री अनिल परब यांचीही चौकशी करावी अशी मागणी केली आहे


परिवहण मंत्री अनिल परब यांच्या विरोधात सुरु करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी काहीजण सुपात आहेत तर काही जण जात्यात असं म्हणत महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर निशाणा साधला असून ही कायदेशीर बाब आहे मे.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जात आहे मात्र हसन मुश्रीफ यांनी हा भाजपाचा कट असल्याचं म्हणन निश्चितच हस्यास्पद असल्याच पाटील यांनी म्हटल आहे. 

परमबीर सिंह मे.सर्वोच्च न्यायालयात गेले तिथून त्यांना मे.उच्च न्यायालयात जाण्यास सांगण्यात आलं तिथे दिलेल्या निकालानुसार कारवाई केली जात आहे काही काळजी करु नका परमेश्वर सर्वांचा हिसाब किताब पूर्ण करतो असंही चंद्रकांत पाटील म्हणाले पुढे बोलताना त्यांनी “परमबीर सिंह यांच्या आरोपांवरुन अनिल देखमुखांविरोधात सिबीआय चौकशी केली जाते तर वाझेने ऑन पेपर अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. 

अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या नावाने वेगवेगळ्या लोकांना धमकावून पैसे घेण्यास सांगितल्याचं वाझेने म्हटलं आहे अशीच चौकशी घोडावतांचीही झाली पाहिजे ज्यांच्याबद्दल वाझेनेच आरोप केले आहेत....

अशीही मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या