💥बोरीत कामठे कंपनीकडून कोरोना नियमाचे उल्लंघन....!

 


 💥मध्यवर्ती कार्यालयात जमावबंदी व संचार बंदीचे तीन-तेरा ? अधिकारी व कर्मचाऱ्यांची विना मास्क गर्दी💥 

बोरी - येथे आर.एस. कामठे इन्फ्रास्ट्रक्चर अंँड डेव्हलोपर्स प्रा.लि.पुणे चे मध्यवर्ती कार्यालय असून या ठिकाणी जिंतूर-परभणी रस्त्याच्या कामासाठी लागणारे सर्व साहित्य, सर्व मालवाहू व इतर वाहनांची पार्किंग, कर्मचाऱ्यांच्या जेवण्याची व्यवस्था असते. या कारणामुळे या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांची दिवसभर वर्दळ असते. असे असताना या ठिकाणी कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. तरीदेखील प्रशासनाकडून  कार्यवाही होत नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

          शासनाने कोरोना ची साखळी तोडण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. ३० एप्रिल पर्यंत जमावबंदी व संचार बंदी चे नियम लागू करण्यात आले आहेत. मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स चा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येत आहे, असे असतांना आर.एस. कामठे या कंपनीकडून शासनाच्या कोरोना विषयीच्या सर्व नियमांना केराची टोपली दाखवल्या जात आहे.

              कंपनीच्या या गैरप्रकारांकडे महसूल व पोलिस विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी झरी येथील रुग्णालयात तपासणी मध्ये काही जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. कंपनीच्या आवारात पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांचा देखील मुक्तसंचार पाहायला मिळाला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची लक्षणीय संख्या असून कोरोना चाचणी करण्यात टाळाटाळ केल्या जात आहे. 

              परभणी चे जिल्हाधिकारी तथा जिंतूर चे कर्तव्यदक्ष तहसीलदार यांनी कामठे कंपनीच्या बेजबाबदार गैरप्रकारांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या