💥सोनपेठ मध्ये आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न....!


💥शहीद सरदार भगतसिंग फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते रक्तदान शिबिराचे आयोजन💥

सोनपेठ (दि.१४ एप्रिल) :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त शहरात शहीद सरदार भगतसिंग वतीने उंडेशनच्यावतीने  बुधवारी दि.14 एपिस  रोजी रक्तदान आयोजन करण्यात आले होते. 


कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांना रक्त साठा उपलब्ध व्हावा या हेतूने  सोनपेठ येथील शहीद सरदार भगतसिंग फाउंडेशन जयंती उत्सव समितीच्या वतीने बुधवारी भीम गड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभाग्रहात  सकाळी 11 ते तीन या वेळेत रक्तदान शिबीर  संपन्न झाले. या रक्तदान शिबिरात सर्वप्रथम सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिपान शेळके यांनी रक्तदान केले.  भीमगड चे नगरसेवक यांनी रक्तदान शिबिरास सहकार्य केले. शिबिरामध्ये महिलांनी सहभाग घेतला.  शिबिरात रक्तदात्यांची संख्या 55 इतकी झाली आहे.


या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शहीद सरदार भगतसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष सतप्रितसिंघ रघबीरसिघ शाहू, उपाध्यक्ष राजेश आरबाड, सदस्य एकनाथ तिरमळे, अर्जुन मोरे,नरेश भाग्यवंत,संतोष किरवले यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या