💥परभणी जिल्ह्यात आज बुधवारी पुन्हा कोरोना महामारीचा उद्रेक; आज जिल्ह्यात आढळले २३५ कोरोनाबाधीत रुग्ण...!


💥जिल्ह्यात आज रुग्णालयात उपचारा दरम्यान एका कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू💥

परभणी (दि.१७ मार्च) - परभणी शहरासह जिल्ह्यात आज बुधवार दि.१७ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ७-०० वाजेपर्यंत तब्बल २३५ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून जिल्ह्यात आज बुधवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात औषधोपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्या  २० व्यक्तींना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात ६१६ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.तर आजपर्यंत ३४७ कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत ९ हजार ७७१ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी ८ हजार ८०८ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख ४४ हजार ४३७ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले त्यात १ लाख ३४ हजार ८६ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ९ हजार ६१८ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह,५९३ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या