💥परभणी जिल्ह्यातील हॉटेल-रेस्टॉरंटसह चहास्टॉल-पानपट्टी सोमवार दि.२२ मार्च पासून दि.३१ मार्च २०२१ पर्यंत राहणार बंद...!


💥जिल्ह्यात पार्सल सुविधाला मात्र जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिली परवानगी💥

परभणी (दि.२० मार्च) - परभणी जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील हॉटेल-रेस्टॉरंटसह चहास्टॉल व पानपट्टी सोमवार दि.२२ मार्च पासून दि.३१ मार्च २०२१ पर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज शनिवार दि.२० मार्च २०२१ रोजी दिले आहेत.रम्यान, चहास्टॉल, रेस्टॉरंट, हॉटेल व किचनला योग्य ती सर्व खबरदारी घेऊन खाद्यपदार्थ बनवीने व फक्त पार्सस्वरूपातच विक्री व वितरित करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जिल्ह्यात चहा स्टॉल, पानपट्टी, रेस्टॉरंट, हॉटेल, किचन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. तसेच या ठिकाणी होणार्‍या गर्दीच्या अनुषंगाने सूचना देऊनही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचेही आदेशात म्हटले आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गात वाढ होऊ नये म्हणून खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही बाबतीत निर्बंध घालणे आवश्यक असल्याने चहास्टॉल, पानपट्टी, रेस्टॉरंट, हॉटेल, लॉन बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी दिले आहेत.

या आदेशा अंमलबजावणी करण्याची दबाबदारी ही जिल्हा पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त, सर्व नगर पालिका व नगर पंचायत मुख्याधिकारी, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांच्यावर राहील, असे आदेशात नमूद केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या