💥आठवड्यातील सोमवार,बुधवार,शुक्रवार रोजी होणार लसीकरण💥
पुर्णा ; तालुक्यातील धानोरा काळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक 10 मार्च 2021 पासून कोरोना लसीकरणात प्रारंभ झाला पहिल्याच दिवशी 94 लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली.
कोरोनाच्या लढाईतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे लसीकरण. मागील महिन्यापासून लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य विभागातील डॉक्टर्स, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका तसेच पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी अंगणवाडी सेविका आदी फ्रन्टलाइन वर्कर्सना लसीकरण करण्यात आले. तर लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून यामध्ये 60 वर्षे वरील नागरिक 45 ते 59 वर्षेचे शुगर , बी पी , किडनी , कर्करोग, ह्रदयरोग आदी आजाराच्य व्यक्तींना लसीकरण करण्यात येत असून प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा काळे येथे दिनांक 10 मार्च रोजी लसीकरणात प्रारंभ झाला. यावेळी पूर्णेचे गट शिक्षणाधिकारी साबळे, जेष्ठ नागरिक बळीरामजी जोगदंड, सरपंच लक्ष्मीबाई परडे , उपसरपंच कैलासराव काळे , ज्ञानेश्वर जोगदंड , उद्धवराव काळे, प्रयोगशील शेतकरी प्रताप काळे ,स्वामी सर , जगन्नाथ कदम , मोतीराम काळे , प्रल्हादराव काळे , रामकिशन काळे, शिवाजीराव काळे , बालासाहेब काळे आदींची उपस्थिती होती.
दिवसभरामध्ये 94 लाभार्थ्यांना लस देण्यात आली असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.पी. देशमुख, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रावजी सोनावणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा काळे येथे कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत असुन सोमवार,बुधवार,शुक्रवार रोजी कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त लसीकरणास पात्र नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश गिणगीने यांनी केले.
लसीकरण सत्र यशस्वीतेसाठी डॉ. मनोज दीक्षित, डॉ. विजय बोरीकर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.बालटकर, देसाई, मुगावकर, आरोग्य सहाय्यक श्री अखिल, डोंगरकर, श्रीमती गायकवाड, आरोग्य सेवक गजानन संगेकर, प्रशांत वैद्य, कनिष्ठ सहाय्यक श्रीराम वाघमारे, आरोग्य सेविका वर्षा पैठणे, संगीता ननुरे, मुक्ता बीडगर, बी.एस.गवई व प्रसाद कांबळे आदींनी परिश्रम घेतले....
0 टिप्पण्या