💥शेतकऱ्यांच्या २६ मार्चच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा जाहिर पाठिंबा...!


 💥महाराष्ट्रात काँग्रेसचा बंदला सक्रिय पाठिंबा असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले💥 

केंद्रातील भाजप सरकारने लादलेल्या कृषी कायद्यांमुळे देशभरातील शेतकरी व शेती उद्धवस्त होणार आहे या कायद्यांना विरोध करण्यासाठी विविध शेतकरी संघटनांनी २६ मार्चला भारत बंदची हाक दिली आहे महाराष्ट्रात काँग्रेसचा बंदला सक्रिय पाठिंबा असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले आहे मोदी सरकार शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधत आहे, तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेल व एल.पी.जी. गॅसच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या आहेत. 

या महागाईने सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहेच, परंतु नोकरदार व मध्यमवर्गीयांचेही कंबरडे मोडले आहे देशात अराजकाची परिस्थिती निर्माण झाली असताना, सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटनांनी २६ मार्चला भारत बंदची हाक दिली असून, काँग्रेसने त्याला सक्रिय पाठिंबा देण्याचे ठरविले आहे, असे पटोले म्हणाले शेतकरी संघटनांच्या बंदला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाच्या वतीने २६ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत राज्य, विभाग, जिल्हा व तालुका मुख्यालयी उपोषण करण्यात येणार आहे. 

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, ज्येष्ठ काँग्रेस नेते व मंत्र्यांसह आपण मुंबईत उपोषणाला बसणार आहे, तर कार्याध्यक्ष हे विभागाच्या मुख्यालयी उपोषण करतील, अशी माहिती पटोले यांनी दिली काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर  गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत या आंदोलनकाळात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत मोदी सरकारने सुरुवातीला चर्चेचा देखावा केला, पण कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मात्र मान्य केली नाही. 

कृषी कायद्यातील बदलांमुळे रास्त भाव दुकाने बंद होणार आहे त्यामुळे गोरगरीब जनता कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या