💥कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जेवणाचे कार्यक्रम, यात्रा,मिरवणुकीस मनाई💥
💫फुलचंद भगत
वाशिम (दि.९ मार्च) : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १५ मार्च २०२१ रोजीच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ११ मार्च २०२१ रोजी होणारा महाशिवरात्री उत्सव वैयक्तिक स्वरुपात घरगुती पद्धतीने साजरा करावा, तसेच यानिमित्ताने जेवणाचे कार्यक्रम आयोजित करून नयेत, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, ९ मार्च रोजी निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार महाशिवरात्री उत्सवानिमित्त ११ मार्च रोजी जेवणाचे कार्यक्रम, यात्रा, मिरवणुका तसेच गर्दी होणारे इतर कोणत्याही प्रकारची कृती करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व अशा व्यक्ती, संस्था, संघटना, यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
प्रतिनीधी-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या