💥अकोला येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले गत १२ दिवसांपासून त्यांच्यावर ‘कोरोना’चे उपचार सुरु होते💥
मातृभूमी, लोकमत, दिव्य मराठी.. अशा विविध वृत्तपत्रांमध्ये २० वर्षांपासून पत्रकारीता करणारे खामगांव जि.बुलडाणा येथील पत्रकार विनोद पाठक (वय ४२) यांचे २६ मार्च रोजी रात्री अकोला येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले. गत १२ दिवसांपासून त्यांच्यावर ‘कोरोना’चे उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात वृध्द आई, पत्नी व ९ व ४ वर्षांची अशी २ लहान मुले आहेत. त्यांच्या निधनाने बुलडाणा जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आह कोरोनाने निधन झाल्यावर फ्रंटलाइन काम करणाऱ्यांना शासनातर्फे ५० लाखांची मदत दिल्या जाते. पत्रकार हेही फ्रंटलाईनवर काम करणारे घटक असल्याने, त्यांचाही मृत्यू झाल्यास ५० लाख रुपये देण्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांनी खामगांव येथेच केली होती.
त्याच खामगांवातील एका पत्रकाराचा आता कोरोनामुळे मृत्यू झाला असून, मृतक विनोद पाठक यांच्या कुटुंबियांना तातडीने ५० लाख रुपये देण्याची मागणी मराठी पत्रकार परिषदेने केली आहे मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख व किरण नाईक अध्यक्ष गजानन नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र काळे, बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण जैन, कार्याध्यक्ष चंद्रकांत बर्दे, उपाध्यक्ष प्रशांत देशमुख आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी विनोद पाठक यांच्याप्रती शोकसंवेदना व्यक्त करुन शासनाकडून अर्थसहाय्याची मागणी केली आहे....
0 टिप्पण्या