💥आम्ही महिलांनी जायचं कुठे ? असा सवाल करत स्वच्छतागृहांसाठी रुग्ण हक्क परिषद ने केलेले आंदोलन..!


💥झाशी राणीच्या पुतळ्यासमोर तीव्र आंदोलन केले आणि महिला स्वच्छतागृहाच्या मागणीसाठी करण्यात आली निदर्शने💥

पुणे - महिला आरोग्यासारख्या अतिमहत्वाच्या प्रश्नावर झोपेचं सोंग घेतलेल्या पुणे महानगर पालिकेला जागं करण्यासाठी, आज दिनांक ८ मार्च २०२१ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरासमोर झाशी राणीच्या पुतळ्यासमोर तीव्र आंदोलन केले. आणि महिला स्वच्छतागृहाच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली.



    पुण्यामध्ये दिवसभर कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या महिलांना आम्ही जायचं कुठे? असा आक्रोश करावा लागतो तेंव्हा,  सुसंस्कृत पुणे, स्वच्छ पुणे, सुंदर पुणे. फक्त कागदावरच, आणि दिखाव्यासाठीच आहे काय? असा खडा सवाल यावेळी रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने उपस्थित केला गेला. पुणे महानगरपालिका आणि आरोग्य खात्याला महिला आरोग्य आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांना होणाऱ्या त्रासाचं काही सोयर- सुतक नाही. सार्वजनिक स्वच्छतागृहही अस्वच्छतागृह जास्त आहेत त्यामुळे महिलांना अनेक आजारांना तोंड द्यावं लागत आहे. दिवसभर घराबाहेर पडणाऱ्या महिलांचे आरोग्य धोक्यात आहे. याकडे  लक्ष वेधण्यात आले.

     यावेळी बोलताना प्राचार्य वृंदा हजारे म्हणाल्या की, अनेकदा पाठपुरावा करून देखील महानगरपालिका या महत्वाच्या आणि गंभीर प्रश्नावर काहीच उपाययोजना करीत नाही. तुलनेत अतिशय कमी संख्येने असलेली दुर्गंधीयुक्त  स्वच्छ्तागृहांची अवस्था सुधारली नाही, तर पुण्यातील महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. 

         महिला आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छ्ता याविषयी पुणे महानगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. असा आरोप देखील वृंदा हजारे यांनी केला. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना महिलांची कुचंबणा होत आहे. याचे काहीच सोयरसुतक पुणे महानगरपालिकेला नाही. अशी घणघणाती टीका रुग्ण हक्क परिषदेचे गोविंद साठे यांनी केली.

    महिला आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता या विषयावर पुणे महानगरपालिकेने लवकरच गांभीर्याने ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर संपूर्ण पुण्यातील महिलांच्या प्रश्नावर लढणाऱ्या, सगळ्या संघटना आणि कार्यकर्त्यांची एकत्रित मोट बांधून, मोठे आंदोलन करु अशा भावना आंदोलन करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

           यावेळी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अपर्णा साठे, कार्यालयीन उपसचिव गिरीष घाग, पुणे शहर उपाध्यक्ष यशस्विनी नवघने, केंद्रीय सल्लागार प्राचार्य वृंदा हजारे, पुणे शहर संघटक सुरेखा कुसाळकर, ज्योती वाघमारे, गोविंद  साठे, सिकंदर मन्सुरी, मुस्कान मन्सुरी दिव्या कोंतम, भाग्यश्री भोर, वृषा गायकवाड आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या