💥परभणी जिल्ह्यात कोरोनाची स्फोटक दिशेने वाटचाल; आज रविवारी जिल्ह्यात आढळले २२१ कोरोनाबाधीत रुग्ण...!


💥जिल्ह्यात रुग्णालयात उपचारा दरम्यान २ कोरोनाबाधीतांचा मृत्यू💥

परभणी (दि.२१ मार्च) - जिल्ह्यात कोरोनाची सातत्याने स्फोटक दिशेने वाटचाल होत असून आज रविवार दि.२१ मार्च २०२१ रोजी कोरोनाने जिल्ह्यात हाहाकार माजवल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात आज रविवार दि.२१ मार्च रोजी तब्बल २२१ कोरोनाबाधीत आढळले असून दोन कोरोनाबाधीत व्यक्तींचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर रुग्णालयात औषधोपचार घेऊन बरे झालेल्या ४० कोरोनामुक्त व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात ८३२ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत ३५० कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत १० हजार ६९६ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी ९ हजार ५१४ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख ४९ हजार ८१४ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख ३८ हजार ५३८ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर १० हजार ५४३ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह,५९३ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या