💥इंजिनियर समीरभाऊ दुधगावकर यांनी दिला पुर्णेकरांना शब्द💥
पुर्णा (दि.१६ मार्च) - पुर्णा येथील धनेश्वरी हेल्थकेअर प्रा.लि येथे सोमवार दि.१५ मार्च २०२१ रोजी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास उद्योजकता या अंतर्गत आयोजित बैठकीत प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून बोलतांना इंजिनियर समीरभाऊ दुधगावकर म्हणाले की पुर्णा शहरातील उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच नवोदित युवकांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी सर्वतोपरी मदत सहकार्यच नव्हे तर त्यांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांना सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी यावेळी समीरभाऊ दुधगावकर यांनी केला.
यावेळी पुढे बोलतांना समीरभाऊ दुधगावकर म्हणाले की नवोदित उद्योजकांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी बँकांतून तात्काळ कर्ज उपलब्ध व्हावे याकरिता बँक संदर्भातील काही प्रलंबित कामे असतील अश्या कामांना गतिदेऊन त्याठिकाणी ठोस भुमिका घेण्याचे आम्ही ठरवले आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देऊन त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मोबदला मिळवून देण्याचे ठरवले असून त्यासाठी शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतिचा माल तयार करावा या कामी पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पुर्णा शहरातील औद्योगिक वसाहती संदर्भात योग्य ती भुमिका घेऊन शासन दरबारी याची दखल घेण्यास भाग पाडू तसेच गावातील बेरोजगार तरुणांना नौकऱ्या उपलब्ध करून देऊ यासाठी बेरोजगार तरुणांनी पुढे येणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले पुढे बोलतांना समीरभाऊ दुधगावकर म्हणाले की समाजातील चांगल्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.समाजाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवने गरजेचे आहे तरच चांगल्या लोकांना संधी मिळू शकते असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संयोजक तथा धनेश्वरी हेल्थकेअर प्रा.लि कंपनीचे संचालक युवा उद्योजक नितीन कापसे यांनी सुध्दा आपले विचार व्यक्त केले यावेळी ते म्हणाले की युवा उद्योजकांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी बँकांतून सहजासहजी कर्ज उपलब्ध होत नाही बँक प्रशासनाकडून वेळोवेळी अडवणूक केली जाते त्यामुळे नवीन उद्योग व्यवसायांना चालना मिळत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली युवा उद्योजक नितीनभैया कापसे यांनी धनेश्वरी हेल्थकेअर प्रा.लि कंपनीची उभारणी करून लॉकडाऊन काळातही असंख्य बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला त्यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद व युवा पिढीला प्रेरणादायक असल्याचे मत यावेळी सर्वांनीच व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार तथा जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स वेबवृत्त वाहिणीचे संपादक दिनेश चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मीकांत उर्फ बाळू कदम,भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष हनुमान अग्रवाल,भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अजय ठाकूर,प्रतिष्ठित व्यापारी राजु धुत,साहित्यिक तथा प्रा.डॉ.सुरेश कदम,आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.डॉ.सुरेश कदम यांनी केले तर सुत्रसंचालन ॲड.रोहिदास जोगदंड यांनी तर आभारप्रदर्शन नितीन कापसे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित व्यापारी उद्योजक नागरिक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय निर्देशांचे काटेकोरपणे पालन करीत उपस्थित होते...
0 टिप्पण्या