💥पुर्णेतील महादेव मंदिर परिसरात धुली वंदनाचे कर्तव्य बजावणारे पोलिस कर्मचाऱ्यांना शिविगाळ करीत दगडफेक...!


💥आरोपी विरोधात पोलिस स्थानकात शासकीय कामात अर्थळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल💥

पुर्णा (दि.२९ मार्च) - शहरातील कदम गल्ली परिसरातील महादेव मंदिर समोरील सार्वजनिक रस्त्यावर आज सोमवार दि.२९ मार्च २०२१ रोजी दुपारी १२-०० वाजेच्या सुमारास धुलिवंदन संदर्भाने कर्तव्य बजावणारे पो.नि.किशोर बालासाहेब कवठेकर व सहकारी कर्मचारी यांनी रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या एकास संचारबंदी असल्याने येथून निघून जा असे म्हणून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता संबंधित युवकाने त्यांना अत्यंत अश्लिल भाषेत शिविगाळ करीत त्यांच्यावर दगडफेक करून दहशत निर्माण करीत शासकीय कामात अर्थळा निर्माण केल्याची गंभीर घटना घडली या प्रकरणी फिर्यादी पो.ना.किशोर बालासाहेब कवठेकर यांनी पुर्णा पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी विश्वनाथ रोडगे रा.कदम गल्ली पुर्णा यांच्या विरोधात गुरनं.१२२/२०२१ कलम ३५३,१८६,१८८,२९४,३३६ सह कलम ११०,११२/११७,६८/१४०,३७/१३५ म.पो.का.सह कलम ७ क्रिमिनल अमेन्डमेंन्ट ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटने संदर्भात पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक गुट्टे हे करीत आहेत.....

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या