💥व्याघ्र गणना डिसेंबर महिन्यापासून; २१ राज्यात राबविण्यात येणार प्रक्रिया....!


💥यापूर्वीची व्याघ्र गणना २०१८ साली झाली होती💥

नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून यंदा २०२२ मध्ये होणाऱ्या व्याघ्र गणनेची तयारी सुरू झाली आहे. पावसाळा संपताच यंदा डिसेंबर २०२१ पासून गणनेची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली. मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्पाच्या संचालकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची एनटीसीएच्या अधिकाऱ्यांसोबत गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

देशभरातील व्याघ्र गणना २१ राज्यांतील जंगलात ‘लाइन ट्रॅन्झॅक्ट मेथड’ (रेषा विभाजन पद्धत) वापरण्यात येणार आहे. वाघांच्या संख्येसोबत वनांची स्थिती, वनस्पती, वृक्ष, जलचर, उभयचर पक्षी, प्राणी, मानवी हस्तक्षेप आदींची माहिती मिळविण्यावर यात भर दिला जाणार आहे. यापूर्वीची व्याघ्र गणना २०१८ साली झाली होती.


डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेने विकसित केलेल्या रेषा विभाजन पद्धतीने २००६ मध्ये प्रथमच देशभरात व्याघ्रगणना करण्यात आली होती. पुढील वर्षी देखील त्याच पद्धतीने व्याघ्र गणनेची मोहीम राबविली जाणार आहे. या पद्धतीने पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर, ताडोबा-अंधारी आणि सह्यांद्री या सहा व्याघ्र प्रकल्पासह वाघांचे अस्त्तिव असलेल्या वनांतही ही गणना केली जणार आहे. त्यासाठी कॅमेरा ट्रॅप, रेंज फायंडर, ॲण्ड्राईड फोन आणि कंपास घेण्यात येणार आहे. एनटीसीएकडे निधिची मागणीही काही राज्यांनी केली असल्याचे संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

देशभरात २०१८ च्या व्याघ्र गणनेनुसार दोन हजार ९६७ वाघांची नोंद झाली आहे. २०२२ च्या व्याघ्र गणनेसाठी देशभरात राबविण्यात येणाऱ्या वेळापत्रकावर काम सुरू आहे. देशभरात २१ राज्यांत प्रत्यक्ष व्याघ्रगणना मार्चच्या अखेरिस केली जाणार आहे. तत्पूर्वी, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, क्षेत्रिय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात होईल. मार्च २०२२ महिन्याच्या अखेरीस प्रत्यक्ष गणना केली जाण्याची शक्यता आहे.


देशाची स्थिती


वर्ष वाघांची संख्या

२००६ १,४११ 

२०१० १,७०६ 

२०१४ २,२२६

२०१८ २,२६७

राज्याची स्थिती


वर्ष वाघांची संख्या

२००६ १०३

२०१० १६९

२०१४ १९०

२०१८ ३१२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या