💥तरुणांनी स्वखर्चाने उभारली शाळेची कमान आणि मुलांना पाणी पिण्यासाठी बसवली पाण्याची टाकी....!


💥यावेळी गावातील जेष्ठ नागरिक व पालक विद्यार्थी उपस्थित होते💥

जिंतूर (दि.३ मार्च) - तालुक्यातील हनवतखेडा येथील युवक योगेश सिरामे यांनी गावासमोर एक आदर्श ठेवत अवांतर खर्चाला फाटा देत आपले हीं गावासाठी देणे लागते या संकल्पने तुन पुढाकार घेत वडिलांच्या सन्मानार्थ शाळेचे नाव असलेला मोठा फलक स्वखर्चाने तयार करून दिला. तसेच नवयुवक संतोषराव पजई यांनी पाण्याची टंचाई लक्षात घेता विदयार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी एक 500 लिटर ची टाकी उपलब्ध करून दिली. यावेळी जनार्धन महाराज आळंदि यांनी व माजी सरपंच शंकर मोरे यांनी शाळेसाठी प्रत्येकी 1000/- रु मदत शाळेला दिली.


यावेळी गावातील जेष्ठ नागरिक व पालक विद्यार्थी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या