💥जिल्ह्यात आज बुधवारी आढळले ५९ कोरोनाबाधित रुग्ण💥
परभणी (दि.३ मार्च) - परभणी शहरासह जिल्ह्यात आज बुधवार दि.३ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ५-०० वाजेपर्यंत तब्बल ५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून रुग्णालयात औषधोपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्या ८० व्यक्तींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात १२० कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत तर जिल्ह्यात आजपर्यंत ३२७ कोरोनाबाधीत रुग्णांचा कोरोना महामारीने बळी घेतला असून जिल्ह्यात आजपर्यंत ८ हजार ६६६ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी ८ हजार २१९ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख २९ हजार २८७ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख २० हजार ५३ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ८ हजार ५५३ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, ५८१ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे....
0 टिप्पण्या