💥डिग्रस बंधाऱ्यातील बॅकवॉटरचा व पाण्याचा सहारा घ्यावा लागत असतो व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही मिटत असतो💥
परभणी (दि.११ मार्च) - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या पालम शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना ई-मेल द्वारे निवेदन सादर करण्यात आले.की,पालम तालुक्यातील गोदावरी नदी पात्रात धानोरा काळे येथील पुलाचे उर्वरित काम करण्यासाठी डिग्रस बंधाऱ्यातून पाणी सोडावे लागणार आहे.यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू असून गोदावरी नदीच्या पात्रात दिग्रस बंधाऱ्यात ह्या वर्षी 47 दलघमी पाणीसाठा होता मागील पंधरा ते एक महिन्या खाली नांदेड शहरासाठी आरक्षित पाणी होते ते पाणी सोडण्यात आले आणि पुन्हा आता पुलाचे काम करण्यासाठी पुन्हा आणखी पाणी सोडले जाणार असल्याने सध्या 97 पालम/गंगाखेड/पूर्णा मतदार संघात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतकऱ्यांनी नवीन ऊस लागवड केली आहे.या मतदार संघातील शेतकऱ्यांचा ऊसाला पाणी देण्यासाठी गोदावरी नदी पात्रातून ऊसाला व शेतीच्या इतर लागवडीसाठी पूर्ण उन्हाळा भर
डिग्रस बंधाऱ्यातील बॅकवॉटरचा व पाण्याचा सहारा घ्यावा लागत असतो व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही मिटत असतो.सालभर जाईन एवढा पाणीसाठा उपलब्ध व्हावा यासाठी शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत धानोरा काळे येथील नवीन पुलाचे गोदावरी पात्रात काम सध्या रखडलेले आहे.उभ्या पिलर चे काम करण्यासाठी किमान एक महिना शेतकऱ्याला मुभा देण्यात यावी व एक महिन्या नंतर गोदावरी नदीपात्रातील नवीन पुलाचे काम तातडीने सुरू करावे सध्याची परिस्थिती पाहता सध्याच पाणी न सोडता एक महिन्यानंतर तातडीने पुलाचे काम सुरू करण्यासाठी संबंधित विभागाला आदेशित करावे करिता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या पालम शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब परभणी यांना ई-मेल द्वारे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर एमआयएम पक्षाचे पालम तालुका प्रभारी अध्यक्ष अनिस खुरेशी यांची स्वाक्षरी आहे....
0 टिप्पण्या