💥हिंगोली जिल्ह्यातील स्वीट मार्ट,बेकरीची दुकाने सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत उघडण्यास परवानगी...!



💥जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकर यांनी परवानगी दिली आहे💥 

हिंगोली (दि.१७ मार्च) : राज्यात तसेच जिल्ह्यात कोव्हीड-१९ बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील दुकानांच्या बाबतीत वेळेचे निर्बंध व आरटीपीसीआर तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. या दरम्यान जिल्ह्यातील स्वीट मार्ट, बेकरी दुकाने यांना सकाळी १०-०० ते दुपारी ३-०० या वेळेत त्यांची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती.

आता जिल्ह्यातील स्वीट मार्ट,बेकरीची दुकाने सकाळी १०-०० ते सायंकाळी ०७-०० या वेळेत उघडण्यास जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, हिंगोली यांनी परवानगी दिली आहे. ही परवानगी केवळ पार्सल सुविधेसाठी राहील. या दरम्यान शासन स्तरावरून कोरोनाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, केंद्रावर येणाऱ्या व्यक्तींनी तसेच केंद्र चालकांनी मास्कचा वापर करणे, तसेच दुकानाची व साहित्याची वेळोवेळी स्वच्छता, सॅनिटायझरेशन (Sanitization) करण्याची दुकानदार यांनी दक्षता घ्यावी. तसेच दुकानदार व त्यांचे कर्मचारी यांची दर १५ दिवसाला आरटीपीसीआर  तपासणी व इतर सूचनांचे पालन करणे अनिवार्य असेल याची नोंद घ्यावी.

या आदेशाची आवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ साथरोग प्रतिबंध कायदा १८९७,महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० अंतर्गत संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या