💥भारतीय जनता पार्टीची निवेदनाद्वारे नगर परिषद प्रशासनाकडे मागणी; तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा💥
पुर्णा (१ मार्च) - पुर्णा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सोमवार दि.१ मार्च २०२१ रोजी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात असे नमूद केले आहे की मागील आठ दिवसापासून शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे निर्जळी झालेली आहे.पाण्याअभावी शहरातील नागरिकांचे हाल होत असून नगर परिषद प्रशासनाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे जनतेला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
पिण्याच्या पाण्या प्रमाणेच शहरातील सर्व भागातील रस्त्यावरील पथदिवे मागील आठ दिवसापासून बंद आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून चोऱ्या होण्याची शक्यता आहे . तरी मा.मुख्याधिकारी साहेबांनी वरील बाबींचा गांभीर्याने विचार करून पुर्णेकरांना तात्काळ पिण्याचे पाणी व पथदिवे सुरू करण्यात यावे अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येई असा इशाराही निवेदनात देण्यात असून या निवेदनावर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मीकांत उर्फ बाळू कदम,भाजपा शहराध्यक्ष प्रशांत कापसे,भाजपा शहर संघटक बालाजी कदम,स्वच्छ भारत अभियानचे जिल्हा समन्वयक विजय कराड,वैभव भायेकर इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
0 टिप्पण्या