💥महाराष्ट्र राज्यात 8 हजार 998 तर संपूर्ण देशात 16 हजार 824 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ....!


💥गेल्या 24 तासांत सुमारे 1 दशलक्ष कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले💥

नवी दिल्ली : महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटकमध्ये कोविडच्या दैनंदिन रुग्णांच्या  आकड्यामध्ये वाढ नोंदविली जात आहे. गेल्या 24 तासांत नोंदवलेल्या नवीन रुग्णांपैकी  85.51% रुग्ण या राज्यातील आहेत. गेल्या 24 तासांत 113 मृत्यूची नोंद झाली आहे. नवीन मृत्यूंपैकी 88.76% मृत्यू हे सहा राज्यात झाले आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 60 मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि मध्य प्रदेशात सक्रिय रुग्ण संख्येत वाढ दिसून येत आहे.

💥महाराष्ट्रात 6,135 कोरोना बाधित रुग्ण बरे💥


महाराष्ट्रात आज 8,998 कोरोना बाधित  रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6,135 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 20,49,484 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 85,144 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.66% झाले आहे.

गेल्या 24 तासांत 16,824 नवीन रुग्णांची नोंद झाली झाले. महाराष्ट्रात  सर्वाधिक 8,998 दैनंदिन नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 18 ऑक्टोबरला नोंद झालेल्या 10,259 नवीन रुग्णांनंतर महाराष्ट्रातील ही सर्वाधिक रुग्ण संख्येची नोंद आहे.त्याखालोखाल केरळमध्ये 2,616 तर पंजाबमध्ये 1,071 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.भारतातील एकूण सक्रीय रुग्ण संख्या आज 1,77,967 वर पोहोचली आहे. भारतातील सध्याच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण हे भारताच्या एकूण बाधित रुग्णांच्या 1.55% आहे.आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार 3,23,064 सत्रांद्वारे 1.66 कोटी (1,66,16,048) पेक्षा जास्त लसींचे डोस दिले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या