💥बिड जिल्ह्यात आज शनिवारी आढळले 375 नवीन कोरोनाबाधीत रुग्ण....!


💥जिल्ह्यात काल 26 मार्च 2021 रोजी 383  नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले होते💥

बिड (दि. 27 मार्च) : बीड जिल्ह्यात आज 27 मार्च 2021  रोजी दुपारी 1.20   वाजता प्राप्त झालेल्या चाचणी अहवालांमध्ये   375  नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक नवे बाधित हे बीड शहर व तालुक्यात 112 संख्येने आढळले आहेत. त्याखालोखाल अंबाजोगाई -75, परळी -38, आष्टी -30, केज -27, माजलगांव -25,  गेवराई -24, पाटोदा -23 , धारुर -12, शिरूर -4, वडवणी -5 असे एकूण 375  नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत , अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. बीड  जिल्ह्यात काल 26 मार्च 2021 रोजी 383  नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले होते.

बीड  जिल्ह्यात काल दिवसभरात एकूण 2713 जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.27 मार्च 2021  रोजी दुपारी प्राप्त झालेल्या चाचणी अहवालांमध्ये  375 पॉझिटिव्ह आणि 2338 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या