💥पुर्णेतील पत्रकाररांच्या वतीने नुतन जिल्हा पदाधिकाऱ्यांचा साने गुरुजी वाचनालयात भव्य सत्कार सोहळा संपन्न💥
पुर्णा (दि.२७ फेब्रुवारी) - पत्रकारिता क्षेत्रात काम करताना अडचण आल्यास पत्रकार संघटना सदैव आपल्या पाठीशी तत्परतेने उभी राहील अशी ग्वाही मराठी पत्रकार संघटनेचे नूतन परभणी जिल्हाध्यक्ष सुरज कदम यांनी दिली.
यावेळी सुरज कदम यांनी पत्रकार संघटनेची बांधनि व संघटनांत्मक कार्याचा आढावा घेत ग्रामीण पत्रकारांनी आपली नाव नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे आवाहन केले. सतीश सतीश टाकळकर यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या मांडल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अतुल शहाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार केदार पाथरकर यांनी केले.
या कार्यक्रमास पत्रकार संघटनेचे दिनेश चौधरी अनिस बाबुमिया, सुशील दळवी,संपत तेली,शेख अफसर,ताडकळस मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी),उपाध्यक्ष फेरोज पठान,सचिव दिपक कानडे,कार्यध्यक्ष मदनराव आंबोरे,सल्लगार,शिवाजी शिराळे,सल्लागार तथा पीबीएन न्यूज चे संपादक धम्मपाल हानवते,कोषाध्यक्ष देवानंद नावकिकर,पत्रकार हनुमान खुळखुळे,शेख शेहजाद ,सचिन सोनकांबळे ,जनार्दन आवरगंड,शमिन पठान आदी उपस्थित होते...
0 टिप्पण्या