💥पुर्णेत इंधन दरवाढी विरोधात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन कडून निदर्शने..!


💥केंद्र सरकार कडून पेट्रोल डिझेल व एलपीजी गॅसचे दर सतत वाढवण्यात येत असल्याने व्यक्त होत आहे संताप💥

पूर्णा (दि.२२ फेब्रुवारी) : येथे आज डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डिवायएफआय) या युवक संघटनेकडून इंधन दरवाढी विरोधात पूर्णा येथील टी पॉईंट येथे निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारकडून पेट्रोल व डिझेल तसेच एलपीजी गॅस चे दर सतत वाढविण्यात येत आहेत ज्याचा परिणाम सामान्य लोकांच्या जीवनमानावर होत आहे. 

सर्वांना कल्पना आहेच की इंधन दर वाढले म्हणजे इतर सर्वच वस्तू पदार्थ महाग होत असतात कारण ते याच इंधनाच्या दळवळणावर अवलंबून असतात.नागरिकांवर पडणारा हा अतिरिक्त भार लक्षात घेऊन व त्यांना इंधन दरवाढीचे सोसावे लागणारे चटके याचा विचार करून पूर्णेतील तरुणांनी एकत्र येत आज पूर्णेतील नांदेड परभणीला जोडणाऱ्या टी पॉईंट येथे सरकार विरोधात निदर्शने केली. तसेच त्यांच्या या मागण्यांचे निवेदन त्यांनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी परभणी यांच्या नावे तहसील कार्यालय पूर्णा यांना दिले. या आंदोलनात नसीर शेख, आनंद वाहिवळ, अमन जोंधळे,जय एंगडे, अजय खंदारे, सचिन नरनवरे, किरण खंदारे, विशाल खंदारे, जाकेर शेख, सलीम शेख, फिजा शेख, राजू शेळके व इलियास आदींचा समावेश होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या