💥राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय; अवैध प्रतिबंधीत गुटखा विक्री करणाऱ्याला भोगावा लागणार आता १० वर्षे कारावास..!


💥अवैध गुटखा तस्करीसह विक्री प्रकरणातील आरोपीविरुद्ध भादवीच्या कलम १८८ सोबतच कलम ३२८ लावता येणार💥

मुंबई - महाराष्ट्र राज्यात मानवी शरिरास अत्यंत घातक ठरत असललेल्या संपूर्ण राज्यात प्रतिबंधीत असलेल्या  गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्रिक्रीला बंदी असतांनाही मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटखा तस्करीसह विक्री होतांना दिसत असून त्यामुळे राज्यात असंख्य लोक या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे कँन्सर सारख्या जिवघेण्या आजाराला बळी पडत आहेत तरीही प्रचंड प्रमाणात गुटखा तस्करांकडून बेकायदेशीर पद्धतीने गुटख्याची विक्री केली जात आहे. मात्र आता या गुटखा विक्री करणाऱ्यांना आळा बसणार आहे कारण राज्य शासनाने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला असून यापुढे.गुटखा विक्री करणाऱ्याला १० वर्षांची शिक्षा आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे. 


अवैध गुटखा तस्करीसह विक्री प्रकरणातील आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ सोबतच कलम ३२८ लावता येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

संपूर्ण राज्यात २०१२ पासून गुटखाजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे. मात्र राज्यात सर्रास विक्री सुरु आहे. याबाबत एका एका आरोपीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.मात्र राज्यातील मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी तसेच नगर व धुळे जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी विरोध करत उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठात रिटा याचिका दाखल केली.

दरम्यान, याचिकेवर याचिकेवर सुनावणी देत सर्वोच्च न्यालयाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आरोपीविरोधात कलम १८८ व ३२८ लावणे आवश्यक असल्याचं सांगून उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंड पीठाने दिलेला निर्णय रद्द केला...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या