💥कासापुरी गणातील ग्रामपंचायती बिनविरोध काढा ; पाच लाखाचा विकास निधी देणार...!


💥पाथरी पंचायत समितीचे सदस्य शरद कोल्हे यांचे गावकऱ्यांना  आवाहन💥

 पाथरी - नदिम तांबोळी - ✍️

पाथरी (दि.२९ डिसेंबर) कासापुरी पंचायत समिती  गणातील ग्रामपंचायती बिनविरोधी काढल्यास गावातील विविध विकास कामे करण्यासाठी पाच लाखांचा विकास निधी उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती कासापुरी गणाचे पंचायत समिती सदस्य शरद शेषेराव कोल्हे यांनी दिली . कासापुरी पंचायत समिती गणामध्ये कासापुरी  पाथरगव्हाण , जवळाझुटा , मंजरथ नाथरा , ग्रामपंचायतचा समावेश आहे . यात जवळाझुटा सोडता बाकी ग्रामपंचायत मध्ये निवडणुक होणार आहे . ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस कमी व्हावी , भांडणा , तंटा वाढु नये गावातील विकास व्हावा शासनाचा निवडणुकीत होणार इतर खर्च होऊ नये तसेच तरुण मुल जे व्यसनाधिन होतात हे होऊ नये हे या मागचा उदेश आहे हा निधी पंचायत समिती मधुन 15 वित्त आयोगातून उपलब्ध करुन देणार  . तसेच बिनविरोध झाल्यास खासदार आमदार गाव आदर्श करण्यात मदत  करतील असे पं. स. सदस्य शरद  कोल्हे यांनी सांगीतले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या