💥शाळा सुरू होणार; परंतु शिक्षक शिक्षतेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी अहवाल शाळेला सादर करणे बंधनकारक...!



💥परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी एक आदेश काढलाय 💥

परभणी (दि.१७ नोव्हेंबर) - जिल्ह्यातील शाळा २३ नोव्हेंबर २०२० पासून सुरू होत असून तत्पुर्वीञ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपली कोरोना चाचणी करून तात्काळ करून घ्यावी  असे या आदेश जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिले आहे. 

राज्यातील शाळा सुरू करण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दिला आहे. यामुळे २३ नोव्हेंबर २०२० पासून शाळा सुरू होणार आहे. तत्पूर्वी शिक्षकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे, तसा आदेशही शिक्षण विभागाने काढला आहे. 

शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेतील सर्व शिक्षकांची दि.१७ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२० दरम्यान आरटीपीसीआर (आरटीपीसीआर) म्हणजेच कोरोना चाचणी करणे शिक्षण विभागाने बंधनकारक केले आहे. चाचणी केल्यानंतरच शिक्षक व शिक्षकेतरांना शाळेत उपस्थित राहता येईल. तत्पूर्वी त्यांना चाचणीचा अहवाल शाळेला सादर करणे बंधनकारक राहणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या