💥जिल्ह्यातील पेडगावात अवैध दारूसह आरोपी अटक💥
परभणी (दि.१३ नोव्हेंबर) - परभणी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक जयंत मिना यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक पदाचा पदभार स्विकारल्या नंतर जिल्ह्यातील पोलीस प्रशासन अवैध धंद्यांच्या विरोधात कमालीचे सतर्क झाल्याचे दिसत असून जिल्ह्यात अवैध वाळू,अवैध गुटखा तस्करी विरोधात पोलीस प्रशासनाने जनुकाही यल्गार पुकारल्याने अवैध धंदे वाल्यांना पळता भुई कमी पडत असल्याचे दिसत आहे आज शुक्रवार दि.१३ नोव्हेंबर रोजी चोरट्या वाळुची अवैध तस्करी करणारा एक टिप्पर ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे.
परभणी - संबर रस्त्यावर अवैध चोरट्या वाळूची वाहतुक होत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यावरून आज शुक्रवारी सकाळी ०८-०० वाजेच्या सुमारास ग्रामीण पोलिस स्थानकाचे पो.नि. गणेश राहिरे यांच्यासह फौजदार संजय गिते,अंगद मुरकुटे, मुंजाभाऊ बहिरट, योगेश सानप, साईनाथ रिट्ठेवाड, देविदास बुकरे यांनी मांगण गावाजवळ एका टिप्परला थांबवले. त्याच्याकडे वाळू बाबत चौकशी केली. त्यावेळी वाळूची विनारपरवाना चोरटी वाहतुक होत असल्याचे निदर्शनास आले. पो.नि.राहिरे यांनी चालकाची चौकशी करीत चालकासह ३ ब्रास वाळूने भरलेला टिप्पर ताब्यात घेऊन पोलिस स्थानकात लावला.
दरम्यान, फौजदार संजय गिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळूने भरलेल्या टिप्परसह ११ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज ताब्यात घेऊन चालकास अटक करण्यात आली असल्याचेही त्यात नमूद केले असून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास कर्मचारी राजेश राठोड हे करीत आहेत.
💥जिल्ह्यातील पेडगावात अवैध दारूसह आरोपी अटक...!
परभणी/जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील पेडगावात अवैध व चोरटी दारू विक्री करणारा आरोपी उद्धव तारे रा.किन्होळा यास ग्रामीण पोलिसांनी आज शुक्रवारी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एका मोटारसायकलसह दारूसह एकूण ५० हजार ४९६ रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलिस कर्मचारी मुंजाभाऊ बहिरट यांनी दिलेल्या फिर्यादीरून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 टिप्पण्या