💥प्रतिबंधीत क्षेत्रातील महिलेच्या अंत्यविधीसाठी ५० ते ६० लोक होते हजर; पुर्णा तालुक्यातील गौर गावातील प्रकार💥
पुर्णा (दि.१३ आॕगस्ट) - पुर्णा-नांदेड रोडवरील गौर गावात मृत्यू नंतर एक महीला कोरोना बाधीत आढळून आल्याची घटना उघडकीस आली.मयत महीलेचा अंतिम संस्कार पार पाडण्यासाठी गावातील भावभावकी तसेच पाहुणे मंडळी यांच्या सह ५० ते ६० जण हजर होते सदरील प्रतिबंधीत क्षेत्रातील कोरोना बाधीत कुटुंबाच्या घरातील मयत महिलेचा मृत्यूनंतर तात्काळ स्वॅब तपासणी साठी आरोग्य विभागाने पाठवला असता तर कदाचित सदरील महिलेच्या अंत्यविधी साठी लोक जमा होऊन त्या मयत महिलेल्या संपर्कात आली नसती परंतु अंत्यविधीचे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळावर पोहोचले व पथकाने मयत महिलेची कोरोनाची रॕपिड अँटिजेन टेस्ट केली यावेळी केलेल्या चाचणीतून मयत महिला कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले यानंतर मात्र गौर ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.
पुर्णा तालुक्यातील गौर येथिल एका ५५ वर्षीय कॅन्सरग्रस्त महीलेचा बुधवारी ता.१२ आॅगस्ट रोजी सायं ५ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला होता.गौर गावात दोन दिवसांपूर्वी त्या मयत महीलेच्या कुटुंबातील एक ९० वर्षीय महीला व २४ वर्षीय पुरुष परभणी जिल्हा रुग्णालयात बाधीत आढळून आले होते.गौर येथे प्रतिबंध क्षेत्रात एक व्यक्ती मयत झाल्याचे येथिल उपकेंद्राला समजताच याची माहिती तृयांनी पुर्णा आरोग्य विभागास कळवली.रात्री आरोग्य विभागाचे टिम गावात दाखल झाली.त्यामयत महीलेच्या अंत्यवीधीसाठी सर्व तयारी उपस्थीतांनी उरकली होती.त्याचवेळी येथे आरोग्य पथकाने तीच्या मृत्यू पश्चात तीची कोरोना चाचणी करण्यासाठी स्वॅब तपासणी साठी घेतले.दरम्यान उपस्थितांनी सदरील महीलेला रितीरिवाज पुर्ण करुन अंत्यविधी घेऊन गेले.एकीकडे अंतीम संस्कार पार पडला न पडलाच आरोग्य विभागाच्या वतीने ती महीला कोरोना बाधीत असल्याचे जाहीर केले.यावेळी उपस्थित असलेल्या मध्ये एकच गोंधळ उडाला.
नातेवाईक, ग्रामस्थांसह उपस्थीत ५० ते ६० जणांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.कोरोना संसर्ग काळात प्रशासनाने कोरोना निर्मुलनासाठी अंत्यविधी व लग्नसोहळ्यासाठी काही अटी पवरवानगी घालून दिल्या आहेत.असे असताना गौर येथे अंत्यविधीसाठी ५० ते ६० ग्रामस्थ जमलेच कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे.
0 टिप्पण्या