💥जालना जिल्ह्यातील मंठा येथील हिंदु तरुणीची एकतर्फी प्रेमातून हत्या प्रकरणाच्या विरोधात सेलूत निवेदन...!💥सेलूतील श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानने दिले उपजिल्हाधिकारी यांना  निवेदन घटनेचा केला निषेध💥

परभणी (दि.०२ जुलै) मंठा येथे हिंदू तरुणीच्या एकतर्फी प्रेमातून झालेल्या हत्येचा श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठान, सेलू चे उपजिल्हाधिकारी यांना  निवेदन देऊन निषेध. मंठा येथील तरुणी वैष्णवी नारायण गोरे हिची एकतर्फी प्रेमातून भर रस्त्यात गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. पुरोगामी महाराष्ट्रा साठी हि एक अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. 

या घटनेतील माथेफिरु आरोपीला तत्काळ फाशी देण्यात यावी. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा. अशा आरोपींना भर चौकात फाशी देण्यात यावी. जेणकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. नसता अशा घटना वारंवार घडल्यामुळे जनतेच्या भावनेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर जयसिंग शेळके, मनिष कदम, अक्षय सोळंके, पवन धुमाळ, ऋषी अंभुरे, महिंद्रा गाडे, बलवंत शेळके, नवनाथ टाले, बाबा शेळके, बालाजी बेटकर, अनिकेत बोराडे, पांडुरंग सावंत यांच्या सह्या आहेत*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या