💥नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातल्या कापसी येथील लाचखोर मंडळ अधिकारी एसीबीच्या ताब्यात....!



 💥रेतीचे ३ टिप्पर चालु देण्यासाठी केली होती लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने प्रतिमहिना ३० हजाराची मागणी💥

नांदेड (दि.०३ जुलै) - जिल्ह्यातील महसुल प्रशासनात कार्यरत भ्रष्टाचाऱ्यांमुळे जिल्ह्यात अवैध रेती तस्करीला लगाम लागत नसल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले असून अवैध रेतीचे तीन टिप्पर चालू देण्यासाठी प्रत्येक महिन्याला हप्त्यापोटी ३० हजार रुपयें रक्कम देण्याची मागणी करून आतापर्यंत त्यातील ११ हजार रुपयें मिळविण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामीण पोलीस स्थानकात महसुल प्रशासनात कार्यरत एका मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात असे नमूद करण्यात आले,की लोहा लालुक्यातील कापशी गावचे मंडळ अधिकारी ननहू गणपतराव कानगुळे वय वर्षे ४६ याने टिप्पर चालू देण्यासाठी प्रति गाडी १० हजार रुपये प्रमाणे हप्ता देण्याची मागणी केली होती या संदर्भात २२ वर्षीय तक्रारदाराने लाचलूचपत विभागाकडे तक्रार केली.यातील १० हजार रुपये यापूर्वीच स्वीकारले होते.तर ११ हजार रुपये मिळविण्याचा प्रयत्न आज शुक्रवार दि.०३ जुलै रोजी केला होता.
यावरून लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने नंदेश ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंद केला असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक कपिल शेळके हे करत आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक विजय डोगरे यांच्या मार्गदर्शनात या पथकात पोलीस कर्मचारी जगनाथ आंनतवार,एकनाथ गंगातीर्थ,शेख मुजीब,विलास राठोड,ताहेर फहाद खान यांच्या पथकाने केली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या