💥परभणी जिल्ह्यातील गंगाखेडला रॅपीड टेस्ट कीट ऊपलब्ध करून देण्याची कॉंग्रेसची मागणी...!💥 तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेसह स्थानिक अधिकाऱ्यांकडे केली मागणी💥

गंगाखेड (दि.१४ जुलै) : कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या  गंगाखेड येथे होत असलेल्या रॅपीड ॲंटीजन टेस्ट बंद करण्यात आल्या आहेत. या भागातील साथ आटोक्यात ठेवण्यासाठी या टेस्टची नितांत गरज आहे. गंगाखेडसाठी या कीट तात्काळ ऊपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी गंगाखेड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेसह स्थानिक अधिकाऱ्यांकडे केली आहे.
गंगाखेड शहर आणि तालुका गेल्या काही दिवसांपासून कोरोना हॉटस्पॉट बनला आहे. शहराच्या जवळपास सर्व भागांमध्ये कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. या रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या मोठी असण्याची आहे. मागील दोन दिवसात गंगाखेड येथे घेण्यात आलेल्या जवळपास ३०० रॅपीड ॲंटीजन टेस्ट मुळे अनेक रूग्ण शोधले जावून त्यांना विलीगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यामुळे कोरोनाच्या वाढत्या साखळीस काही प्रमाणात का होईना अटकाव करण्यात प्रशासनाला मदत झाली आहे.

आज मात्र या रॅपीड टेस्ट बंद करण्यात आल्या आहेत. आता संशयीत आणि कोरोना रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे स्वॅब तपासणीसाठी ईतर ठिकाणी पाठवले जात आहेत. ही पद्धत वेळखाऊ असल्याने कोरोना रूग्ण लवकर शोधणे अवघड बनले असून संशयीतांची संख्या पाहता या रॅपीड टेस्ट वाढवणे आवश्यक आहे. म्हणून गंगाखेड तालुक्यासाठी अशा जास्तीत जास्त कीट लवकरात लवकर ऊपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविॅद यादव यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री नवाब मलीक, आ. सुरेश वरपुडकर जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या