💥जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२३ वर पोहचली आहे💥
परभणी (दि.०२ जुलै) - परभणी शहरासह तालुक्यात आज गुरुवार दि.०२ जुलै रोजी सकाळी ४ कोरोनाबाधित रुग्ण सापडले तर सायंकाळी दर्गा रोडवर आणखी एक ३४ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२३ वर पोहचली आहे.
सोलापूर येथून परभणी शहरातील दर्गा रोड येथील परतलेला ३४ वर्षीय रहिवासी व्यक्ती जो व्यवसायाने चालक असून तो सोलापूरहून परभणीला आला होता. त्याला खोकला व श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे तो तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात गेला. यावेळी जिल्हा रुग्णालयात त्याचे स्वॅब घेवून तो नांदेड येथील प्रयोगशाळेकडेतपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज गुरुवारी सायंकाळी त्या व्यक्तीच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे..
0 टिप्पण्या