💥परभणी जिल्ह्यातील उमरी,भोसा शिवारात कोसळलेल्या जोरदार पावसाने इंद्रायणी नदीवरील पुल गेला वाहून...!💥वडगाव ते ब्रह्मपूरी या मधल्या मार्गाची वाहतुक पूर्णत: बंद💥 

परभणी (दि.२ जुलै) - उमरी,भोसा शिवारात कोसळलेल्या जोरदार पावसाने वडगाव गावालगत असलेला इंद्रायणी नदीवरील पुल वाहून गेला.दरम्यान, यामुळे वडगाव ते ब्रह्मपूरी या मधल्या मार्गाची वाहतुक पूर्णत: बंद पडली तर याच पुलावर गावचा अर्ध्या शेतशिवाराची वाहतुक असल्याने मोठे त्रांगडे होऊन बसले आहे.

वरच्या भागात पाऊस पडल्याने आलेल्या मोठ्या पूरात हा पूल वाहून गेला. पूलाच्या पलीकडच्या बाजूस अर्धाधिक शिवार आहे. त्यातच आता पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे आमच्यासाठी या पुलाचे महत्त्व अधिक आहे. हा पूल तातडीने दुरूस्त करावा अशी मागणी वडगाव येथील परमेश्‍वर सुक्रे यांनी केली आहे.

बुधवारी (ता.एक) दुपारी एक ते चारच्या सुमारास लोहरा, भोसा, उमरी आदी भागात मोठा पाऊस झाला. त्यामुळे दुपारी चारनंतर या परिसरातून वाहणार्‍या इंद्रायणी नदीला मोठा पूर आला.

तामसवाडीनजिक असलेल्या पूलावर पाणी असल्याने यामार्गावरील वाहतुक दुपारनंतर बंदच होती. रात्री उशिरा ही वाहतूक सुरू झाली. तर वडगावमधील तब्बल बारावर्षापूर्वी बांधलेला नळ्यांचा पूलही या नदीच्या पूराने वाहून गेला.

दरम्यान, वडगावहून ब्रह्मपूरी, साळापूरी (ता. परभणी) साठी जाण्याचा अत्यंत जवळचा मार्ग असल्याने अनेक नागरिक याच मार्गाने वागत असत. तर या पुलाच्या पैलतीरी वडगावचा अर्धाधिक शेतशिवार आहे.

त्यामुळेच या पुलाचे महत्त्वही अधिक आहे. त्यातच आता पावसाळ्याचे दिवस आहेत. याचा मोठा फटका परिसरातील शेतकर्‍यांना बसणार आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने पूल करून परिसरातील शेतकर्‍यांची गैरसोय थांबविण्याची मागणी वडगाव गावकर्‍यांच्या वतीने करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या