💥पुर्णेतील इंग्रजी शिक्षण क्षेत्रातील अवलीया एस.जब्बार सर लिखित पुस्तक 'दिशा' हे विद्यार्थ्यांना देत आहे नवीन दिशा..!
💥मराठी भाषिक विद्यार्थांना इंग्रजी विषयात आपल्या 'दिशा' नामक पुस्तकातून 'दिशा' दाखवणारा 'अवलीया' एस.जब्बार 💥

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजेच शिक्षण होय.
बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रातही बदल झाला. त्यानुसार अभ्यासक्रम , पाठयपुस्तक व प्रश्नपत्रिकेचे स्वरूप यातही बदल झाला. त्यामुळे साहजिकच इयत्ता दहावीच्या पुनर्रचित अभयसक्रमामध्ये सुद्धा बदल झाला ,आज प्रश्नपत्रिकेची जागा कृतीपत्रिकेने घेतली म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पूर्वतयारी पेक्षा कृतीवर अधिकाधिक भर द्यावा लागत आहे,
नवीन शैक्षणिक धोरणानुसार भाषा विषयांच्या अभ्यासक्रमात व प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात बदल झाला. त्यानुसार दहावीच्या इंग्रजी विषयात सुद्धा बदल झाला. मुळातच मराठी भाषिक मुलांना इंग्रजी या विषयाची भीती वाटते मग या पुनर्रचित इंग्रजीच्या अभ्याक्रमाची अनामिक भीती मराठी भाषिक विद्यार्थ्यांच्या मनात साहजिकच  निर्माण झाली होती , आणि तीच भीती दूर करण्यासाठी पूर्णा सारख्या ग्रामीण भागातून एक शिक्षक पुढे आले ते म्हणजे
एस.जब्बार.पूर्णा येथील नामांकित शिक्षण संस्था विद्या प्रसारिणी च्या जवाहरलाल नेहरू शाळेत सदरील शिक्षक मागील 16 वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करतात.  मागील सोळा वर्षांपासून त्यांनी अध्यापन कार्याबरोबरच मराठी भाषिक विद्यार्थ्यांच्या मनस्थितीचा खोल अभ्यास केला व श्रवण, भाषण,संभाषण,वाचन,लेखन, अध्ययन कौशल्य व भाषाभ्यास यांचा वापर करून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी या विषयाचे मार्गदर्शक गाईड तयार केले. ज्या मध्ये पाठयपुस्तकातील प्रश्नासोबतच लेखन कौशल्य, व्याकरण, व भाषाभ्यास इत्यादी बाबींचा समावेश आहे,म्हणजे एकदा हे पुस्तक विद्यार्थ्यांनी घेतले तर अभ्यासासाठी दुसरे कोणतेही पुस्तक खरेदी करण्याची गरज भासणार नाही.


हे पुस्तक लिहिन्यांमगिल कल्पना स्पष्ट करताना एस जब्बार म्हणतात की मागील अनेक वर्षांपासून मार्केट मध्ये जी परंपरागत पुस्तके उपलब्ध आहेत ती शहरी विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून तयार केली जातात , आणि मुळातच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी अवघड जाते मग उपलब्ध पुस्तके सुद्धा त्यांच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरत नाही , हीच बाब लक्षात घेऊन माझे गुरू
श्री जगदीश जोगदंड यांच्या प्रोत्साहनाने व  डॉ दत्तात्रय वाघमारे व श्रीनिवास काबरा यांच्या आशीर्वादाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहज सोपं आणि सुलभ भाषेचा वापर करीत हे पुस्तक तयार केलं दिशा हे पुस्तक विद्यार्थ्यांना एक नवीन दिशा देणार ठरेल या अनुषंगाने त्या पुस्तकाचे नाव सुद्धा ""दिशा"" असे ठेवण्यात आले आहे.


आणि महत्वाची बाब म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यामच्या आर्थिक अडचणींना लक्षात घेऊन मार्केट मध्ये सध्या उपलब्ध असलेल्या पुस्तकांच्या अगदी निम्म्या किमती मध्ये हे पुस्तक मिळत आहे. हे पुस्तक तयार करण्यासाठी एस. जब्बार यांना नवनाथ भताने व पंडित रणवीर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सदरील पुस्तक महाराष्ट्राचे पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे आणि थोर साहित्यिक फ.मु.शिंदे यांना सुद्धा खूप आवडले व या दोन्ही महान व्यक्तींनी या पुस्तकात आपले संदेश छापण्यासाठी दिले, यावरूनच या पुस्तकाची गुणवत्ता आपणास कळते.

पुस्तक तयार झाल्यानंतर पूर्णा शहराचे उपनगराध्यक्ष श्री विशाल कदम , संतोष एकलारे, शाम कदम  यांच्या प्रयत्नाने पुस्तकाचे भव्य दिव्य असे  प्रकाशन परभणी जिल्ह्याचे लाडके खासदार श्री संजय जाधव यांच्या हस्ते झाले व पहिल्याच प्रकाशनाचे सर्व पुस्तके शिवसेनेतर्फे खरेदी करून शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त संपूर्ण परभणी जिल्ह्यात  गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले.दिशा या पुस्तकाची व शिवसेना पूर्णा यांच्या या स्तुत्य उपक्रमाची महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री मा. आदित्य ठाकरे यांनी सुद्धा दखल घेत कौतुकाची थाप या सर्वांना दिली.

शेवटी आपण एवढच म्हणू शकतो या पुस्तकात दिलेल्या आपल्या शुभेच्छा संदेशा मध्ये प्राचार्य के राजकुमार, मुख्याध्यापक डी एल उमाटे , मुख्याध्यापिका अतिया बेगम प्राचार्य केशव जोंधळे, प्राचार्य सुरेश धुमाळे यांनी सांगितले की  एका ग्रामीण भागातल्या शिक्षकाने ग्रामीण भागातल्या मुलांच्या मनातली इंग्रजी विषयाची भीती दूर करण्यासाठी सहज, सोप्या भाषेत तयार केलेलं हे पुस्तक विद्यार्थ्यांना निश्चितच उपयुक्त ठरेल..

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या