💥महाराष्ट्र राज्यात आज सोमवार दि.१३ जुलै रोजी ६४२९ नवे कोरोना बाधीत रुग्न ४१८२ रुग्णांना सुट्टी...!  • 💥राज्यात कोरोनाच्या साडे तेरा लाख चाचण्या – आरोग्यमंत्री 💥

  • 💥कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ५५ टक्क्यांवर कायम💥

मुंबई, दि. 13 (प्रतिनिधी):   राज्यात आज ४१८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४४ हजार ५०७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६४२९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख ४२ हजार ७९२ नमुन्यांपैकी २ लाख ६० हजार ९२४ नमुने पॉझिटिव्ह (१९.४३ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८७ हजार ३५३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४१ हजार ६६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज १९३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२ टक्के एवढा आहे.राज्यात नोंद झालेले १९३ मृत्यू हे मुंबई मनपा-४७, ठाणे-५, ठाणे मनपा-२३, नवी मुंबई मनपा-७, कल्याण-डोंबिवली मनपा-१८, उल्हासनगर मनपा-२, भिवंडी-निजामपूर मनपा-४, वसई-विरार मनपा-६, पनवेल मनपा-५, नाशिक-१, नाशिक मनपा-९, अहमदनगर-१, अहमदनगर मनपा-१, धुळे मनपा-२, जळगाव-७, जळगाव मनपा-१, पुणे-५, पुणे मनपा-२०, पिंपरी-चिंचवड मनपा-५, सोलापूर-१,सोलापूर मनपा-६, सांगली-१, सांगली मिरज कुपवाड मनपा-२,औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-२, लातूर-२, उस्मानाबाद-३, अकोला-२,अमरावती-१, वाशिम-१, नागपूर मनपा-१, भंडारा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.
  • एकूण: बाधित रुग्ण-(२,६०,९२४)
  • बरे झालेले रुग्ण-१,४४,५०७)
  • मृत्यू- (१०,४८२)
  • इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९८)
  • ॲक्टिव्ह रुग्ण-(१,०५,६३७)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या