💥जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी केले आदेश जारी💥
परभणी (दि.०२ जुलै) परभणी जिल्ह्यातील कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आज गुरुवार दि.०२ जुलै रोजी मध्यरात्रीपासून ते रविवार दि.०५ जुलै २०२० रोजी मध्यरात्री १२-०० वाजेपर्यंत महानगरपालिका आणि जिल्ह्यातील पाथरी,मानवत,सेलू,गंगाखेड,पालमजिंतूर,सोनपेठ,पुर्णा या तालुक्यात नगरपालिका हद्दीतील ५ किलोमीटर अंतरापर्यंत कडक संचारबंदीचे आदेश जारी केलेत.
हे तीन दिवस संचारबंदी महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिका हद्दीत अत्यंत कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.
म्हणजे नगरपालिका नगर पंचायत आणि महानगरपालिकेच्या हद्दीतील ५ किलोमीटर अंतरापर्यंत सर्व व्यवहार अत्यावश्यक कामाच्या व्यतिरिक्त पूर्णपणे बंद राहतील लोकांनी घराबाहेर पडू नये कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरक्षित रहावे असे आवाहन ही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिले.....
0 टिप्पण्या